"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:48 IST2025-10-04T14:31:54+5:302025-10-04T14:48:55+5:30
आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे.

"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची काढायला आलेली पीक वाया गेली आहेत. शेतकऱ्यांनी आता भरपाईसाठी राज्य सरकारकडे मागणी सुरू केली आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत बांगर यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
आमदार संतोष बांगर यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. यामध्ये, ते एका अधिकाऱ्याला धमकावत असल्याचे दिसत आहे. 'हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा. नाहीतर पीक विमाकंपनीचे जिथे जिथे ऑफिस आहेत ते चुरा करू', असा इशारा त्यांनी दिला.बांगर यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
'पीक विम्या संदर्भात काही कमी जास्त झाले तर संतोष बांगर ऐवढा वाईट माणूस नाही',असंही बांगर बोलत असल्याचे दिसत आहे. 15 ऑगस्ट च्या अगोदर पीक कंपनी प्रोग्राम मध्ये डोगराळ भागातले गावे निडवल्याने आमदार बांगर आक्रमक दिसले. विमा अधिकारी आणि आमदार संतोष बांगर यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी, पुरामुळे नद्या, नाले, ओढ्या काठच्या जमिनीवरील पिके शंभर टक्के वाया गेली आहेत. सखल जमिनीवरील पिकांची अवस्था वाईट आहे. उत्पादकतेसह मालाच्या दर्जा खालावल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक बसला आहे.