वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत, अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST2021-02-12T04:27:53+5:302021-02-12T04:27:53+5:30

हिंगोली : साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांची वृद्धापकाळी आर्थिक कारणामुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून शासनाकडून मानधन योजना ...

The honorarium of older writers and artists has been stagnant since November, increasing difficulties | वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत, अडचणी वाढल्या

वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत, अडचणी वाढल्या

हिंगोली : साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांची वृद्धापकाळी आर्थिक कारणामुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून शासनाकडून मानधन योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ५८३ साहित्यिक, कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र नोव्हेंबरपासून या वृद्ध कलावंत, साहित्यिकांचे मानधन रखडल्याने त्यांना विवध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पूर्वी ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जात होती. आता सांस्कृतिक कार्य सेवा संचालनालयामार्फत राबविली जात आहे. वयाची ५० वर्षे झालेले कलावंत, साहित्यिक या योजनेसाठी पात्र ठरतात. जिल्ह्यात एकूण ५८३ लाभार्थी आहेत. मागील वर्षभरापासून साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात वाढ केली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते. दरवेळेस मानधन मिळत असल्याने लाभार्थ्यांचे दर महिन्याचे नियोजन व्यवस्थित होत होते. मात्र मागील नोव्हेंबरपासून मानधन रखडले आहे. अगोदरच कोरोनामुळे हातबल झालेल्या कलावंतांना आता आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दर महिन्याला मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

मानधन किती रुपये (प्रति माह)

राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - ३१५०

राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २७००

जिल्हा पातळीवरील कलाकार साहित्यिक - २२५०

प्रतिक्रिया

वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबर महिन्यापासून रखडले आहे. मानधन मिळत असल्याने आर्थिक अडचणी दूर होत होत्या. आता मानधन रखडल्याने आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मानधन त्वरित जमा करावे.

- देविदासराव घोंगडे

अगोदरच कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधनही रखडल्याने महिनाभराचे आर्थिक गणित जुळविताना अडचणी येत आहेत.

- नारायण घोंगडे

वृद्ध कलावंतांचे मानधन दर दोन महिन्यांनी मिळत असते. त्यामुळे आर्थिक समस्या जाणवत नाही. परंतु, नोव्हेंबर महिन्यापासूनचे मानधन लवकर मिळाल्यास आर्थिक अडचण दूर होईल.

- तुकाराम कुलकर्णी

मानधन मिळणारे कलावंत, साहित्यिक

राष्ट्रीय स्तरावरील -०१

राज्य स्तरावरील - ५२

जिल्हा स्तरावरील - ५३०

Web Title: The honorarium of older writers and artists has been stagnant since November, increasing difficulties