हिंगोली - नांदेड रस्त्यावरील अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:50 IST2018-09-29T13:44:14+5:302018-09-29T13:50:31+5:30
: हिंगोली - नांदेड या राज्य महामार्गावरील पारडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजता घडली.

हिंगोली - नांदेड रस्त्यावरील अपघातात दोन ठार
कळमनुरी (हिंगोली) : हिंगोली - नांदेड या राज्य महामार्गावरील पारडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की, लक्ष्मण सुरेश पोले हे आपल्या दुचाकीने ( एमएच -३७ एच - १२१६ ) दुसऱ्याच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी कुटूंबासह जात होते. त्यांच्यासोबत पत्नी रेखा (२५), मुलगा शुभम (५) व आर्यन (२) हे होते. ते मुख्य रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या भीषण अपघातात लक्ष्मण पोले जागीच ठार झाले तर रेखा, शुभम व आर्यन हे गंभीर जखमी झाले. सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोनि जि.एस. राहिरे, फौजदार जामगे, घेवारे यांनी धाव घेत जखमींना कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान आर्यनचा मृत्यू झाला. जखमीवर डॉ.फरीदा गोव्हर, डॉ. एम.डी. पंचलिंगे, डॉ. सोफीया खान यांनी उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.