Hingoli: नांदेड डीआयजींच्या पथकाची वारंगा फाटा येथे धाड; ​साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:33 IST2026-01-19T12:31:51+5:302026-01-19T12:33:44+5:30

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा भागात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली होती.

Hingoli: Nanded DIG's team raids at waranga phata; Gutkha worth 14.5 lakhs seized | Hingoli: नांदेड डीआयजींच्या पथकाची वारंगा फाटा येथे धाड; ​साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

Hingoli: नांदेड डीआयजींच्या पथकाची वारंगा फाटा येथे धाड; ​साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

​वारंगा फाटा (जि. हिंगोली) : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने १९ जानेवारी रोजी सकाळी वारंगा फाटा फाटा परिसरात छापा टाकला. या कारवाईत १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा आणि १० लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, डीआयजींच्या पथकाची या भागातील अवैध गुटखा विक्रीविरुद्धची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

​कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा भागात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, १९ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पथकाने या भागात सापळा रचला. या छाप्यामध्ये १४ लाख ६७ हजार १२० रुपयांचा गुटखा, एक जीप आणि दोन पिकअप अशी १० लाख रुपयांची वाहने, असा एकूण २४ लाख ६७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

​ही कारवाई विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ तलेदवार, हेड कॉन्स्टेबल प्रवीण खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, चालक कामाजी गवळी तसेच वारंगा फाटा बीट जमादार शेख बाबर आणि प्रभाकर भोंग यांच्या पथकाने केली. ​विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याविरुद्ध केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : हिंगोली: डीआईजी दस्ते का छापा, 14.5 लाख का गुटखा जब्त।

Web Summary : नांदेड डीआईजी टीम ने हिंगोली के वारंगा फाटा में छापा मारा, ₹14.67 लाख का गुटखा और ₹10 लाख के वाहन जब्त किए। दो गिरफ्तार। यह क्षेत्र में अवैध गुटखा बिक्री के खिलाफ दूसरी बड़ी कार्रवाई है। गुप्त सूचना के आधार पर छापे मारे गए।

Web Title : Hingoli: DIG squad raid seizes gutkha worth ₹14.5L, vehicles.

Web Summary : Nanded DIG's team raided Waranga Phata, Hingoli, seizing gutkha worth ₹14.67L and vehicles worth ₹10L. Two arrested. This is the second major action against illegal gutkha sales in the area. Raids were conducted based on a tip.