Hingoli: वाहनावरील नियंत्रण सुटले; चालक जागीच ठार

By विजय पाटील | Updated: March 22, 2024 23:20 IST2024-03-22T23:19:55+5:302024-03-22T23:20:13+5:30

Hingoli News: शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान केळी घेऊन जाणाऱ्या एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन नदीत जावून कोसळले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेडगाव येथील पुलावर घडली.

Hingoli: Lost control of vehicle; The driver died on the spot | Hingoli: वाहनावरील नियंत्रण सुटले; चालक जागीच ठार

Hingoli: वाहनावरील नियंत्रण सुटले; चालक जागीच ठार

- विजय पाटील
हिंगोली - शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान केळी घेऊन जाणाऱ्या एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन नदीत जावून कोसळले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेडगाव येथील पुलावर घडली.

२२ मार्च रोजी सायंकाळच्यावेळी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथून नऊ टनाच्या केळीच्या कॅरेट भरून रेडगावमार्गे एक ट्रक (क्र. एमएच ४०- वाय २२०३) नागपूरकडे जात होते. परंतु रेडगाव येथे पुलाच्या वळणावर चालकाच्या हातून वाहन सुटले. यामुळे सदर वाहन नदीत जाऊन कोसळले. या अपघातात चालक नंदू बाळकृष्ण मानकर (वय ४६, रा. नागपूर) याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी डोंगरकडा पोलिस चौकीचे जमादार नागोराव बाभळे, गजानन सरकटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रेत विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा येथे पाठविण्यात आले.

Web Title: Hingoli: Lost control of vehicle; The driver died on the spot