Hingoli: 'अखेरची ठरली वडिलांची भेट'; आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:05 IST2025-06-26T14:56:23+5:302025-06-26T15:05:02+5:30

याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Hingoli: 'It was the last meeting with her father'; Student ends life in Pimpaldari tribal hostel | Hingoli: 'अखेरची ठरली वडिलांची भेट'; आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन

Hingoli: 'अखेरची ठरली वडिलांची भेट'; आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील पिंपळदरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ती पिंपळदरी येथील आदिवासी आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बुधवारी (दि. २५) रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाइकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी रोखून धरली होती.

पिंपळदरी येथे आदिवासी आश्रमशाळेत स्वाती सुखदेव झाटे हिने वसतिगृहातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती कळताच वसतिगृहाच्या अधीक्षकांनी गळफास काढून तिला तत्काळ पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून स्वातीची अवस्था गंभीर असल्याने लागलीच हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले; परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वाती झाटे ही पहिलीपासून या आश्रमशाळेत शिक्षण घेत होती.

अखेरची ठरली वडिलांची भेट
वडील सुखदेव झाटे यांनी २४ जून रोजी पिंपळदरी येथे शाळेत तिला आणून घातले. जातीचे प्रमाणपत्र शाळेतच काढण्यात येत असल्यामुळे तिच्या वडील परत २५ जून रोजी सकाळी कागदपत्रे घेऊन आश्रमशाळेत आले आणि मुलीशी बोलून परतले. त्यानंतर दुपारच्या सत्रात स्वातीने इतर मुलींसोबत जेवण केले आणि मैत्रिणींना वसतिगृहाच्या खोलीमध्ये जाते म्हणून सांगितले. खोलीमध्ये गेल्यानंतर लागलीच तिने सिलिंग फॅनला ओढणी अडकवून गळफास घेतला.

Web Title: Hingoli: 'It was the last meeting with her father'; Student ends life in Pimpaldari tribal hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.