'कांद्याच्या आड गांजाची शेती'; पोलिसांच्या छाप्यात ८० झाडे जप्त, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:12 IST2026-03-17T14:11:52+5:302026-03-17T14:12:52+5:30

शेतात कांदा की गांजा? गोरेगाव पोलिसांचा माहेरखेड्यात थरारक छापा

Hingoli Crime: Ganja Cultivation Hidden in Onion Crop Busted; Contraband Worth ₹84,000 Seized | 'कांद्याच्या आड गांजाची शेती'; पोलिसांच्या छाप्यात ८० झाडे जप्त, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

'कांद्याच्या आड गांजाची शेती'; पोलिसांच्या छाप्यात ८० झाडे जप्त, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

गोरेगाव (जि.हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या छाप्यात अंदाजे ८४,६५० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सेनगाव तालुक्यातील माहेरखेडा शिवारात एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोरेगाव पोलिसांनी माहेरखेडा गावाबाहेरील गुगुळपिंपरीकडे जाणाऱ्या रोडवरील एका शेतात छापा टाकला. आरोपी विठ्ठल विश्रामजी ढोक (वय ६५ वर्षे) यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतातील कांदा बियाण्याच्या पिकात गांजाच्या झाडांची गुपचूप लागवड केली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ किलो ७४० ग्रॅम वजनाची ८० गांजाची झाडे (किंमत अंदाजे एकूण ८४,६५० रुपये) जप्त केली आहेत. या गांजाच्या झाडांना फुले, हिरवे पाने आणि बोंडे आलेली होती, ज्याचा उग्र वास परिसरात येत होता. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने नमुने घेऊन सर्व झाडे मुळासकट उपटून जप्त केली आहेत.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (बी)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. झळके आणि त्यांच्या पथकाने केली असून, सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title : हिंगोली में प्याज के खेत में गांजे की खेती का भंडाफोड़

Web Summary : हिंगोली पुलिस ने गोरेगांव में प्याज के खेत में छिपे गांजे के खेत का पर्दाफाश किया। अधिकारियों ने ₹84,650 अनुमानित मूल्य के 80 गांजे के पौधे जब्त किए और एक व्यक्ति को गिरफ्तार किया। आरोपी ने निजी लाभ के लिए अवैध फसल उगाई, जिससे स्थानीय आक्रोश फैल गया क्योंकि पुलिस आगे जांच कर रही है।

Web Title : Marijuana farm hidden in onion field busted in Hingoli

Web Summary : Hingoli police discovered a marijuana farm concealed within an onion field in Goregaon. Authorities seized 80 marijuana plants, estimated at ₹84,650, and arrested one individual. The suspect cultivated the illicit crop for personal gain, sparking local outrage as police investigate further.