हिंगोलीत कॉंग्रेसने गाजराचा केक कापून केला सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:10 IST2018-10-31T19:08:12+5:302018-10-31T19:10:51+5:30
भाजप सरकारच्या चौथ्या वर्षपूर्ती विरोधात एनएसयुआय व युवक कॉंग्रेसने गाजराचा केक कापुन सरकारचा निषेध केला.

हिंगोलीत कॉंग्रेसने गाजराचा केक कापून केला सरकारचा निषेध
हिंगोली : भाजप सरकारच्या चार वर्षातील कामगिरीचा निषेध करत एनएसयुआय व युवक कॉंग्रेसने गाजराचा केक कापला. सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पाळले नाही याचा आंदोलकांनी गाजर वाटप करून निषेध केला.
सरकारने केवळ आश्वासने दिली असून मागील चार वर्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आज भाजप सरकार विरोधात कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला. सरकारने रोजगाराच्या फसव्या घोषणा केल्या यामुळे युवक त्रस्त आहेत. याचा निषेध आंदोलकांनी करत गाजरचा केक कापला. एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महाविद्यालयत विद्यार्थ्यांना गाजर वाटप केले.