Hingoli: राशनचे स्वस्त धान्य देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:42 IST2026-01-09T18:42:33+5:302026-01-09T18:42:57+5:30

शिधापत्रिका मिळूनही अन्नधान्याचा लाभ सुरू न झाल्याने त्यांनी वेळोवेळी अर्ज सादर केले.

Hingoli: Clerk caught red-handed while taking bribe of Rs 3,000 for BPL scheme benefits | Hingoli: राशनचे स्वस्त धान्य देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले

Hingoli: राशनचे स्वस्त धान्य देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले

कळमनुरी : बी.पी.एल. व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील लिपिक चक्रधर पंडितराव कदम (वय ३९) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ८ जानेवारी रोजी दुपारी सुमारास रंगेहाथ पकडले.

९ डिसेंबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांच्या भावाने १८ सप्टेंबर २०२२ रोजी कुटुंबीयांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करून बी.पी.एल. योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. शिधापत्रिका मिळूनही अन्नधान्याचा लाभ सुरू न झाल्याने त्यांनी वेळोवेळी अर्ज सादर केले. अखेर ६ ऑक्टोबर रोजी बीपीएल व प्राधान्य कुटुंब योजनेत नाव समावेश करून स्वस्त धान्य मिळवून देण्याबाबत पुन्हा अर्ज करण्यात आला.

८ डिसेंबर रोजी कामाच्या अनुषंगाने तक्रारदार पुरवठा विभागातील लिपीक चक्रधर कदम यांना भेटले. अंतिम आदेश काढून देण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या भावाकडून प्रत्येकी ४ हजार रुपये प्रमाणे एकूण ८ हजार रुपयांची लाच त्यांनी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात ९ डिसेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपीने दोन फायलीसाठी प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण ३ रुपयांची लाच मागून स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

८ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीच्या पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचून कारवाई केली. आरोपीने तक्रारदारास लाचेची रक्कम टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकण्यास सांगून पंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत ३ हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून, त्यात आरोपीजवळ कार्यालयाचे ओळखपत्र, चष्मा, पेन, कार्यालयाची चावी, रुमाल व मोबाईल आदी साहित्य आढळले. मोबाईल तपासणी करून आवश्यकता भासल्यास जप्तीची तजवीज ठेवण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यवतमाळ यांच्यामार्फत सुरू आहे.

आरोपीविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू करीत आहेत. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विकास घनवट, हवालदार गजानन पवार, भगवान मंडलिक, पोलिस शिपाई अमोल जाधव, शिवाजी वाघ यांनी केली.

Web Title : हिंगोली: राशन वितरण के लिए रिश्वत लेते लिपिक रंगेहाथ गिरफ्तार।

Web Summary : हिंगोली में बीपीएल योजना के तहत राशन वितरण के लिए 3,000 रुपये की रिश्वत लेते हुए एक लिपिक को गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने शिकायत के बाद जाल बिछाया। आरोपी ने शुरू में ₹8,000 की मांग की थी। आगे की जांच जारी है।

Web Title : Hingoli: Clerk caught red-handed taking bribe for ration distribution.

Web Summary : A clerk in Hingoli was arrested for accepting a ₹3,000 bribe to facilitate ration distribution under BPL scheme. The Anti-Corruption Bureau laid a trap after a complaint. The accused demanded ₹8,000 initially. Further investigation is underway.