हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५५ हजारांची लाच घेताना एकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:05 IST2018-09-03T18:04:55+5:302018-09-03T18:05:39+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५५ हजारांची लाच घेताना एकास पकडले
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
मधुकर बनकर असे या इसमाचे नाव असून तो जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील रहिवासी आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे जिल्हा कचेरीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या दालनात अधिकारी तळ ठोकून आहेत . यात अटक केलेला इसम खाजगी असला तरी त्याचे कार्यालयातील शासकीय लागेबांधे काय होते. याबाबत चाचपणी सुरू आहे.