Hingoli: उत्पन्नापेक्षा ३० टक्के अधिक मालमत्ता; सेवानिवृत्त गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:56 IST2025-10-28T15:55:00+5:302025-10-28T15:56:03+5:30
विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Hingoli: उत्पन्नापेक्षा ३० टक्के अधिक मालमत्ता; सेवानिवृत्त गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा
हिंगोली : कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी आणि त्यांची पत्नी रेखा खिल्लारी यांच्याविरुद्ध उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेहिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
१ जानेवारी २००५ ते १५ मार्च २०२२ या परीक्षण कालावधीतील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी व त्यांची पत्नी रेखा खिल्लारी यांच्या आर्थिक नोंदी तपासण्यात आल्या. खिल्लारी दाम्पत्याने त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल ४४ लाख ५ हजार ७७५ रुपये म्हणजेच अधिकची ३०.७८ टक्के इतकी अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी, रेखा मनोहर खिल्लारी (रा. वाशिम) यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विकास घनवट तपास करत आहेत.