कार दुभाजकावर आदळल्याने पती-पत्नी जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 11:10 IST2023-09-03T11:09:10+5:302023-09-03T11:10:04+5:30

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात

Hingoli Accident A husband and wife were killed on the spot, one seriously injured when the car hit the divider | कार दुभाजकावर आदळल्याने पती-पत्नी जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

कार दुभाजकावर आदळल्याने पती-पत्नी जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

इलियास शेख

कळमनुरी (जि. हिंगोली) : येथील हिंगोली- नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे ही घटना 3 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली.

प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे, त्यांची पत्नी व मुलगा कारने नांदेडहून हिंगोलीकडे येत होते कार कळमनुरी शिवारात आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आढळली. कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या यात प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे (वय68) , मंजुषा जयप्रकाश कावरखे (वय 60) हे दोघे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा पराग पाटील कावरखे हा गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, प्रशांत शिंदे, संजय राठोड, कैलास सातव तसेच महामार्गाचे फौजदार उमर शेख, गजानन तायडे ,प्रवीण राठोड ,वसीम शेख, सय्यद तय्यब, शैलेश मुदीराज आदींनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमी पराग पाटील कावरखे याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तो गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

Web Title: Hingoli Accident A husband and wife were killed on the spot, one seriously injured when the car hit the divider