इकडे मालक झोपेत; तिकडे दुचाकी गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:01 IST2018-03-23T00:22:11+5:302018-03-23T12:01:54+5:30
दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इकडे मालक झोपेत; तिकडे दुचाकी गायब !
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील रमेश त्र्यंबक कºहाळे हे डिग्रसकºहाळे ते लोहगाव फाटा यामार्गे दुचाकीवरून जात होते. परंतु कºहाळे यांना गाडी चालविताना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी उभी केली. व विसाव्यासाठी ते सावली पाहून एका जागी बसले. चक्कर आल्याने व दुचाकीवरील प्रवासानंतर आराम करत असताना कºहाळे यांना अचानक झोप लागली. यावेळी त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी क्रमांक एमएच-३८-यु-७५७० पळविली. कºहाळे यांना थोड्या विश्रांतीनंतर जाग येताच त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यामुळे वाहन चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हिंगोली ग्रामीण ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.