पाच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:26 IST2018-03-21T00:21:16+5:302018-03-21T11:26:17+5:30

पाच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतकरी आत्महत्या मदत समितीने पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. चार फेरचौकशीत असून एक फेटाळला आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक झाली. यामध्ये एकूण दहा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले होते. त्यातील एक फेटाळले तर चार प्रकरणांत फेरचौकशीचा आदेश देण्यात आला आहे. तर हिंगोली तालुक्यातील आंबाळा तांड्याचे संजय जाधव, केसापूरच्या राधाबाई किसन खंदारे, कळमनुरी तालुक्यातील हिवºयाचे चंपती धोंडिबा लोणे, पार्डीचे माधव खरवडे व वसमत तालुक्यातील पिंपराळ्याचे रामराव कदम यांच्या वारसांना मदत मिळेल.