शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:47 IST

मुख्यालयी राहण्याचा नियमाला सेनगाव येथील अधिकारी-कर्मचाºयांनी हरताळ फासला असून तालुकास्तरीय सर्वच कार्यालयाचे जवाबदार अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे निर्धारित वेळेत होत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मुख्यालयी राहण्याचा नियमाला सेनगाव येथील अधिकारी-कर्मचाºयांनी हरताळ फासला असून तालुकास्तरीय सर्वच कार्यालयाचे जवाबदार अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य जनतेची कामे निर्धारित वेळेत होत नाहीत.सेनगाव येथे तालुका स्तरीय तहसील, पंचायत समिती, तालुका आरोग्य कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, दिवाणी व फौजदारी न्यायालय, पोलीस स्टेशन, भूमिअभिलेख कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. या कार्यालयात मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. पंरतु या अधिकारी- कर्मचाºयांना राहण्यासाठी सेनगाव येथे शासकीय निवासस्थाने तसेच अन्य सुविधा नसल्याची कारणे देवून सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करीत आहेत.येथील तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, सह दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश व काही बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी-कर्मचारी केवळ मुख्यालयी राहतात. उर्वरित अधिकारी - कर्मचारीच नव्हे, सेवकही अपडाऊन करीत आहेत. अशांचीच संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासकीय कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणावरून किंवा पर जिल्ह्यातून अपडाऊन करणाºयांचा आकडा तालुक्यात वाढला आहे.ये-जा करणारे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात किमान अकरा वाजेपर्यंत येत नाहीत. आल्यानंतर तासभर इकडचे तिकडे केल्यावर दुपारचे मध्यंतर व त्यानंतर पुन्हा घरी जाण्याची गडबड या चक्रात सेनगावचे सर्वच शासकीय कार्यालये अडकली आहेत. यावर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ अधिकारीच अप-डाऊन करीत असल्याने कर्मचाºयांना जाब विचारायचा प्रश्नच नाही. यामुळे कार्यालयीन कामकाजाचे तास किमान सेनगावपुरते तरी कमी झाले आहेत. शिवाय बैठका, दौºयांची कारणे वेगळीच.याचा फटका ग्रामीण भागातून शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना सोसावा लागत आहेत. एका फेरीत कोणत्याच कार्यालयात काम होत नाही, ही ओरड कायमची झाली आहे. काही कार्यालयात उपलब्ध शासकीय वाहनाचा वापर अपडाऊनसाठी केला जात असल्याची शोकांतिका आहे. तर घरभाडे भत्ताही बहुतेकजण उचलत असून त्याची पडताळणी केल्यास हा प्रकार थांबू शकतो.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार