Gutkha stocks worth Rs 3 lacs seized in Hingoli | हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

हिंगोली : शहरातील तलाब कट्टा भागातील एकाच्या घरातून तब्बल ३ लाख ३० हजार ७२० रूपये किमतीचा गुटखा शहर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ११ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील एकाच्या घरी गुटख्याचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पो. उप. नि. गंगाधर बनसोडे, जमादार एस.पी. जाधव, जी.व्ही. सोनटक्के, आसेगावकर, मपोशि परविन शहा आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ११ एप्रिल रोजी रात्री ९.५० च्या सुमारास तलाब कट्टा भागातील सागर श्यामराव माने यांच्या घरी छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात १ लाख ९४ हजार ४८० रूपये किमतीचे विमल पान मसाल्याचे मोठे १०४० पॉकेट, १ लाख २४ हजार ८०० रूपये किमतीचे विमल पान मसाल्याचे लहान १०४० पॉकेट, ६ हजार ८६४ रूपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे २०८ पॉकेट, ४ हजार ५७६ रूपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे २०८ पॉकेट असा ३ लाख ३० हजार ७२० रूपये किमतीचा साठा आढळून आला. 

पोलिसांनी रात्री घरातील लाईटच्या प्रकाशात गुटख्याचा पंचनामा केला असून यातील दोन पॉकेट नमून्यादाखल विश्लेषणास्तव काढून घेत उर्वरित साठा शहर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पो.उप.नि. गंगाधर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून सागर श्यामराव माने (रा. तलाब कट्टा) याच्याविरूद्ध पो.उप.नि. पांडे यांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास स.पो.नि. शहारे करीत आहेत.

Web Title: Gutkha stocks worth Rs 3 lacs seized in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.