रमजान ईदनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:08+5:302021-05-13T04:30:08+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ...

Guidelines of the district administration on the occasion of Ramadan | रमजान ईदनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

रमजान ईदनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

Next

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे, नमाज पठणासाठी मशिदीत, मोकळ्या जागेत अथवा इदगाहच्या ठिकाणी एकत्र येऊ नये, खरेदी ही वेळेतच करून सहकार्य करावे, बाजारामध्ये सामान खरेदीसाठी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच विनाकारण रस्त्यावर फिरू नये, रमजान ईदनिमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे आदी सूचनांचा समावेश आहे.

ईद साधेपणाने साजरी करा

धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Guidelines of the district administration on the occasion of Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.