शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

चार मुलांनी चार दिशांनी घरे बांधली; वृद्ध आईचा खून करून मृतदेह पुरल्याचेही नाही कळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:36 IST

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई इंगळे घरी एकट्याच राहतात. त्यांची चार मुले गावातच इतर ठिकाणी राहतात.

ठळक मुद्देघाटाच्या दिशेने कुत्री भुंकल्याने ग्रामस्थांच्या प्रकार आला लक्षात

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील घाटात पुरला. ही घटना ही घटना शनिवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. भारजाबाई मारोती इंगळे (८५) असे त्या मृत वृद्धेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई इंगळे घरी एकट्याच राहतात. त्यांची चार मुले गावातच इतर ठिकाणी राहतात. १० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा उघडून त्यांचा खून करून गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील साखरा ते साखरा तांडा परिसरातील घाटात मृतदेह पुरून टाकला. यानंतर पहाटे आखाड्यावरील कुत्र्यांनी त्यादिशेने भुंकण्यास सुरुवात केली. कुत्री भुंकत असल्याने काही शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. जवळ जाऊन पाहिले असता, घाटामध्ये खड्डयात माती टाकलेली आढळली. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा प्रकार गावात सांगितला. तसेच पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. 

सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पो. नि. कृष्णदेव पाटील, पोउपनि अभय माकणे, जमादार राहुल कोरडे, दिलीप नाईक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावर खोदून पाहिले असता, भारजाबाई इंगळे यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. तसेच गावातील सीसीटीव्ही फुटेजमधून काही सुगावा लागताे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूHingoliहिंगोली