राष्ट्रवादीला (शप) धक्का! माजी मंत्री दांडेगावकरांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर भाजपच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 18:11 IST2026-02-16T18:10:31+5:302026-02-16T18:11:03+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिष दांडेगावकर भाजपचे कमळ हाती घेतील.

Former minister Jayaprakash Dandegaonkar's son Atish Dandegaonkar will join BJP; Big blow to NCP (SP) | राष्ट्रवादीला (शप) धक्का! माजी मंत्री दांडेगावकरांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर भाजपच्या मार्गावर

राष्ट्रवादीला (शप) धक्का! माजी मंत्री दांडेगावकरांचे सुपुत्र अतिष दांडेगावकर भाजपच्या मार्गावर

वसमत: हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र तथा कपिश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अतिष दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसणार असून राजकीय वर्तुळात यावर चर्चा रंगली आहे. 

कार्यकर्त्यांच्या साक्षीने घेतला ऐतिहासिक निर्णय
सोमवारी (१६ फेब्रुवारी) माळवटा येथे अतिष दांडेगावकर यांनी समर्थकांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदारसंघाचा रखडलेला विकास यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर, बहुमताने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत होणार शक्तीप्रदर्शन
येत्या २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे हा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अतिष दांडेगावकर भाजपचे कमळ हाती घेतील. "वसमत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे," अशी स्पष्टोक्ती दांडेगावकर यांनी यावेळी दिली. अतिष दांडेगावकर यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात भाजपची ताकद मतदारसंघात अनेक पटींनी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title : राष्‍ट्रवादी कांग्रेस को झटका: पूर्व मंत्री दांडेगांवकर के बेटे अतिश बीजेपी में होंगे शामिल

Web Summary : पूर्व मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर के बेटे अतिश दांडेगांवकर भाजपा में शामिल होंगे, वसमत में राष्‍ट्रवादी कांग्रेस को झटका। समर्थकों के साथ बैठक के बाद निर्वाचन क्षेत्र के विकास का हवाला देते हुए निर्णय लिया। आधिकारिक प्रवेश 24 फरवरी को मुंबई में होगा।

Web Title : NCP Setback: Ex-Minister Dandegaonkar's Son, Atish, To Join BJP

Web Summary : Atish Dandegaonkar, son of ex-minister Jaiprakash Dandegaonkar, is set to join BJP, dealing a blow to NCP in Vasmat. He decided after meeting supporters, citing constituency development. The official induction will be in Mumbai on February 24.