वसमत येथे भर रस्त्यात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:59 IST2018-11-14T00:59:39+5:302018-11-14T00:59:55+5:30

शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वाराना अनेकांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.

 Foggy road across the Vasmat | वसमत येथे भर रस्त्यात हाणामारी

वसमत येथे भर रस्त्यात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वाराना अनेकांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.
वसमत येथील झेंडाचौक ते पोलीस ठाणे रस्त्यावर रहदारीची कोंडी व वादावादीचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारासही असाच प्रकार घडला व प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. हाणामारीने काहीवेळ गोंधळाचे वातावरण होते. बघ्यांची गर्दीही झाली होती. मात्र हाणामारी करणारे आपापल्या रस्त्याने निघून गेल्याने प्रकरणावर पडदा पडला. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. मात्र तोवर पांगापांगा झाली होती. राड्याचे नेमके कारणही समजले नाही. बाजारपेठेतील रहदारींची कोंडी वरूनच हा वाद झाल्याचे समजते. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत न जाता थंड झाल्याने घटनेची नोंद झाली नाही व राड्याचे कारण, हाणामारी करणारेही कोण होते हे समजू शकले नाही.

Web Title:  Foggy road across the Vasmat