शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या ८७ जणांना २ लाखांच्यावर लावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्याप्रमाणे नगर परिषद वर्षभरापासून कारवाईचे करण्याचे काम करीत ...

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्याप्रमाणे नगर परिषद वर्षभरापासून कारवाईचे करण्याचे काम करीत आहे. याकरिता पोलीस विभाग त्यांना मदतही करीत आहे. अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले नाही. तरीही काही नागरिक बिनधाास्तपणे विनामास्क रस्त्याने फिरताना आढळून येत आहेत.

२१ मार्च २०२० पासून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद व पोलीस विभागाचे संयुक्तिक पथक स्थापन करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२१ पासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला जाऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाला २४ फेब्रुवारीपासून संचारबंदी लावावी लागली होती. त्यानंतर १ ते ७ मार्च दरम्यान टाळेबंदीही करण्यात आली होती. २०२१ मध्ये १४९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बॉक्स

२०२१ मध्ये १४९ जणांना लावला दंड

२०२१ मध्ये १४९ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापोटी ४७ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही बिनधास्तपणे नागरिक फिरताना दिसून येत आहेत. नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून नगरपरिषद कारवाई करीत आहे.

बॉक्स

दोन मंगल कार्यालयांना एक लाख रुपयांचा दंड

गत दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. असे असताना शहरातील दोन मंगल कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नगर परिषद पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून दंडापोटी प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे १ लाख वसूल केले आहेत.

बॉक्स

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगर परिषद विनामास्क फिरणाऱ्यांवर तसेच जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. यात काही अडचण आली तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागही नगर परिषद पथकाला सहकार्य करीत आहे.

-विद्यासागर श्रीमनवार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा