बाप-लेकाच्या भांडणात आईचा मृत्यू;मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:08 IST2018-06-30T11:08:18+5:302018-06-30T11:08:48+5:30

वडील व मुलाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने ढकलून दिल्याने भिंतीवर आदळून तीचे डोके फुटले.

In the father-son dispute, mother died | बाप-लेकाच्या भांडणात आईचा मृत्यू;मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल

बाप-लेकाच्या भांडणात आईचा मृत्यू;मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल

वसमत ( हिंगोली) : येथील फुले नगर भागात वडील व मुलाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने ढकलून दिल्याने भिंतीवर आदळून तीचे डोके फुटले. गुरुवारी उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडिलाच्या फिर्यादीवरुन वसमत शहर पोलिसांत मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसमत येथील फुलेनगर भागातील किशनराव अवचार व त्यांचा मुलगा मनोज यांच्यात मंगळवारी रात्री घरगुती कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. प्रकरण हातघाईवर गेले. बाप-लेकातील वाद मिटवण्यासाठी आई लक्ष्मीबाई  यांनी धाव घेतली. त्यांनी दोघांनाही भांडणापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने आईला ढकलून दिले. त्यामुळे लक्ष्मीबाई यांचे डोके भिंतीवर आपटले व त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविले होते.

उपचारादरम्यान लक्ष्मीबाई यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी किसनराव अवचार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोनि रवींद्रसिंह धुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रुपाली कांबळे करत आहेत.

Web Title: In the father-son dispute, mother died