कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST2018-10-24T00:45:21+5:302018-10-24T00:45:35+5:30
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे विजेच्या समस्येवरून पाच गावांतील शेतकºयांनी महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालय बंद पाडले. दरम्यान, भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी मध्यस्थी करीत वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. तर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकरी शांत झाले.

कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे विजेच्या समस्येवरून पाच गावांतील शेतकºयांनी महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालय बंद पाडले. दरम्यान, भाजपा नेते रामरतन शिंदे यांनी मध्यस्थी करीत वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. तर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकरी शांत झाले.
सेनगाव तालुका आधीच दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यात महावितरणकडून वीजपुरवठा होत नसल्याने शिवणी बु., पार्डी पोहकर, जांभरून रोडगे, वरूड काजी येथील शेतकरी विजेच्या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी पुसेगावच्या ३३ के.व्ही. वीज कार्यालयावर धडकले. घोषणाबाजी करीत कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. शेतकºयांची ही आक्रमक भूमिका पाहता रामरतन शिंदे यांनी महावितरण कार्यालयात जावून अभियत्ाां लगडेवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी रामगिरवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या पाच गावांच्या फिडरवर भार सारखा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी दिले. यानंतर शेतकºयांची समजूत काढत यशस्वीपणे शिष्टाई घडवून आणली.