नाफेड हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:44 IST2018-10-26T00:44:00+5:302018-10-26T00:44:26+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी शेतीमालासाठी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी हमीभाव केंद्रात नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाफेड हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी मुदतवाढ
हिंगोली : तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी शेतीमालासाठी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी हमीभाव केंद्रात नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव केंद्रात आता १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच खरेदी केंद्रही लवकर सुरू होणार असल्याची माहिती आहे. हिंगोली तालुक्यासाठी जुने शासकीय रूग्णालयासमोर तोफखाना येथील शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रावर नांव नोंदणी सुरू आहे. केंद्रावर सोयाबीन ३ हजार ३९९, मूग ६ हजार ९७५, उडिद ५ हजार ६०० असा हमीभाव आहे. यापुर्वी २४ आॅक्टोबरपर्यंत मूग व उडीद तर ३१ आॅक्टोबरपर्यंत सोयाबीनसाठी नोंदणीची तारिख होती.