शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वसमत पुन्हा हादरले! पांगरा शिंदे परिसरात गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:59 IST

३ महिन्यांच्या विश्रांतीनंतर वसमतमध्ये जमिनीतून मोठा आवाज; भूगर्भ शास्त्रज्ञांच्या तपासणीची मागणी

-इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली): वसमत तालुक्यासह परिसरात भूगर्भातून गूढ आवाज येऊन जमीन हादरण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. तब्बल तीन महिन्यांच्या शांततेनंतर आज, २५ मार्च रोजी सकाळी ८:०९ मिनिटांनी पांगरा शिंदे या गावांसह परिसरातील अनेक गावांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सव्वा आठ वाजता 'गूढ' आवाजबुधवारी सकाळी अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाला आणि जमीन हादरली. याचा सर्वाधिक फटका पांगरा शिंदे, कुरुंदा, डोणवाडा, कोठारी, वापटी, कुपटी आणि शिरळी या गावांना बसला. "सकाळी अचानक मोठा आवाज झाला आणि घरातील भांडी पडली. आम्ही घाबरून घराबाहेर पळालो," अशी आपबीती स्थानिक नागरिक संतोष शिंदे यांनी सांगितली. अधिकृत यंत्रणेकडे या धक्क्याची नोंद अद्याप झाली नसली, तरी प्रत्यक्षदर्शींनी हा हादरा मोठा असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रशासकीय अनास्था आणि वाढती असुरक्षितताहिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तीन तालुक्यांत गेल्या सात वर्षांपासून सातत्याने जमिनीतून आवाज येण्याच्या घटना घडत आहेत. २०२५ मध्येही अनेकदा मोठे धक्के बसले होते. मात्र, वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत ठोस तपासणी केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हिंगोलीचा हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील होत चालला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasmat Shaken Again: Earthquake-like Tremors and Mysterious Sounds Cause Panic

Web Summary : Vasmat region experienced earthquake-like tremors and mysterious sounds, creating panic among residents. Pangra Shinde and surrounding villages were most affected. Locals demand investigation into the recurring phenomenon, citing administrative inaction despite past incidents and growing safety concerns.
टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली