खोदकाम करताना विहिरीत क्रेन कोसळल्याने मजूराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:29 IST2019-05-02T18:27:54+5:302019-05-02T18:29:36+5:30

डोक्याला गंभीर मार लागल्याने मजुराचा मृत्यू

Due to collapse of crane in excavation, labor deaths | खोदकाम करताना विहिरीत क्रेन कोसळल्याने मजूराचा मृत्यू

खोदकाम करताना विहिरीत क्रेन कोसळल्याने मजूराचा मृत्यू

हिंगोली : सेनगाव परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू होते. खोदकाम सुरू असताना गुरुवारी (दि.२) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अचानक क्रेन विहिरीत कोसळला. यात क्रेनखाली दबून एक मजूर जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सेनगाव शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेन विहिरीत कोसळले. त्याखाली दबून सुभाष मासू सुर्वे (३५, रा. वसा ता. जिंतुर जि. परभणी ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुर्वें यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असे डॉ. चव्हाण म्हणाले. तर या दुर्घटनेत एक महिला व एक पुरूष दोघे जखमी आहेत.

Web Title: Due to collapse of crane in excavation, labor deaths