शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : दुष्काळाने तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:23 IST

दुष्काळवाडा : खरीपाचा लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले.

- राजकुमार देशमुख, धोतरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

परतीच्या पावसाने दगा दिला आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. सेनगावपासून ३० कि.मी. अंतरावर येलदरी धरणाच्या कुशीत असलेले धोतरा गाव दुष्काळाच्या छायेत अडकले आहे. कोरडवाहू, खडकाळ जमीन असलेल्या धोतरा या गावाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निम्मे गाव कोयता घेऊन उसाच्या फडावर जाते. 

खरीप हंगामात प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके बहरली होती; परंतु परतीच्या पावसाने एकदमच खंड दिल्याने सोयाबीन पीक शेंगा लागण्यापूर्वीच वाळून गेले. काढणी खर्चही निघाला नसल्याने प्रमुख पीकच हातचे गेल्याने संपूर्ण गाव आर्थिक संकटात सापडले आहे. शेवटच्या टप्प्यात दमदार एकही पाऊस झाला नसल्याने तुरीचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे. तूर, कपाशीचे पीक वाळून गेल्याने जनावरे चरण्यासाठी सोडून दिले आहेत.

पावसाअभावी खरीपच गेल्याने रबीचा विचारही शेतकऱ्यांनी केला नाही. दरवर्षी खरिपानंतर रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकाची पेरणी या भागात केली जाते; परंतु यावर्षी सर्वत्र ओसाड जमिनीचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आॅक्टोबरमध्येच गंभीर झाल्याने दुष्काळाची दाहकता आगामी काळात भयंकर संकटाचे संकेत देत आहे. दुष्काळग्रस्तांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीचे शासनाने वेळीच नियोजन करण्याची गरज आहे.

-  ५६० : लोकसंख्या- १३२५ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र - ३५७ हेक्टर लागवडीयोग्य जमीन - २२५ हेक्टरवर सोयाबीन - ४५ हेक्टरवर तूर- १६ हेक्टरवर कापूस- १० हेक्टरवर मूग

दुष्काळाची दाहकता तीव्र शासनाच्या संभाव्य दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रबीची पेरणी २५ टक्के झाली. धोतरा परिसरात दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. - गंगाधर बळवंतकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी  

बळीराजा काय म्हणतो? - सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. उगवले नसल्याने दुबार पेरणी केली; परंतु पाऊस झाला नसल्याने सोयाबीन काढणीला पुरली नाही. धुईने कापूसही हातचा गेला आहे. पुढे कसे जगावे? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. - नानाराव थिटे 

- सोयाबीनची दोन थैल्यांची पेरणी केली होती. पंचमीनंतर पाऊसच झाला नाही. सोयाबीन जागेवर वाळून गेले. केवळ चार कट्टे सोयाबीन झाले. - फकिरराव थिटे 

- तीन एकर जमीन आहे. काही जमिनीवर कापूस लावला. कापसाच्या प्रत्येक झाडाला दोन बोंडे आली आहेत. वाळलेल्या तुरीच्या पिकात जनावरांना सोडले आहे. - नामदेव वाकळे 

- तीन एकरात सोयाबीन पेरले होते; पण पावसाने दगा दिला आणि हाताशी आलेला घास गेला. पेरणीचा खर्चही निघाला नाही. तीन कट्टे चिपडा सोयाबीन झाले. तिला जनावरेही खात नाहीत. - कोंडीराम वाकळे 

- धोतरा गावात यापूर्वी अशी दुष्काळी परिस्थिती केव्हाच उद्भवली नाही. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले. उदरनिर्वाहासाठी या भागात हाताला काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे. - रवींद्र गडदे

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी