हिंगोली शहरात साडेतीनशे घरकुलांचा डीपीआर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:58 IST2018-07-21T23:58:34+5:302018-07-21T23:58:57+5:30
शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होऊन घरकुल बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे पालिकेकडून सांगितले.

हिंगोली शहरात साडेतीनशे घरकुलांचा डीपीआर मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होऊन घरकुल बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे पालिकेकडून सांगितले.
घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी रात्रंदिवस एक करीत आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्यानुसार यंत्रणेमार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या घरकुलाच सर्वे केला आहे. तर येत्या दोन ते तीन दिवसांत निधी प्राप्त होणार असल्याने लाभार्थ्यांना बांधकाम सुरु करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी भागवत शिंदे यांनी सांगितले. तसेच लाभार्थ्यांची गैरसोय होऊन देण्यासाठी त्यांनी केलेल्या बांधकामाच्या स्थितीनुसार निधी देण्यात येणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले. तर बऱ्याच भागातील लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र त्यांना निधीच मिळाला नसल्याने ते पालिकेच्या पायºया झिजवत आहेत. घरकुलांना मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना नकाशे दिले जात असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.