शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कृषी विभागात अर्ध्यावर खुर्च्या रिकाम्याच ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:48 AM

येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.येथील तालुका कृषी कार्यालयांतर्गत प्रारंभीपासून कृषी सहायकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तालुक्यात एकूण ३६ कृषी सहाय्यकाची पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १८ कार्यरत आहेत. या स्थितीत ३१ मे रोजी लातूर विभागीय स्तरावरून कृषी अधिकाºयांच्या झालेल्या बदल्यांमध्ये सेनगाव तालुका कृषी कार्यालयाला मोठा फटका बसला आहे. प्रमुख जबाबदार सर्व अधिकाºयांच्या बदल्या झाल्याने तालुका कृषी कार्यालय ओस पडले आहेत. कृषी विभागाने विभागीय बदल्या करताना रिक्त पदांचा समतोल राखण्याकडे दुर्लक्ष केल्याने सेनगाव तालुका कृषी कार्यालयाला एकही जबाबदार अधिकारी मिळाला नाही. परिणामी, तालुका कृषी कार्यालयाचा कारभार वाºयावर आहे.येथील तालुका कृषी अधिकारी आर.बी. हारणे यांची परभणी जिल्हा परिषद येथे बदली झाली आहे. त्यांचे पद रिक्त झाले आहे. सेनगाव मंडळ कृषी अधिकारी पद चार वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार पाहणारे कृषी पर्यवेक्षक जी.आर. शिंदे यांची मानवत येथे बदली झाली आहे. साखरा मंडळ कृषी अधिकारी एस.एस. लिंबाळकर यांची उमरखेड येथे बदली झाली आहे. गोरेगाव मंडळ कृषी अधिकारी जी.जे. बळवंतकर यांची शिरडशहापूर येथे बदली झाली आहे. आजेगावचे पर्यवेक्षक बी.एम. शिंदे यांची औंढा येथे बदली झाली आहे. या सर्व अधिकाºयांच्या जागी तालुक्यात एकही नवीन अधिकारी आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाचे महत्त्वाची सर्व पदे रिक्त झाली आहेत. अशा स्थितीत तालुका कृषी अधिकाºयांचा पदभार देण्यासाठी तालुक्यात एकही मंडळ कृषी अधिकारी उरला नाही. त्यामुळे सेनगाव तालुका कृषी कार्यालयाचा कारभार विभागीय कृषी विभागाच्या धोरणामुळे अडचणीत आला आहे. तालुका कृषी कार्यालयातील महत्वाच्या पदाचा प्रभारी पदभार कोणाकडे द्यावा, या चिंतेत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सापडले आहे. ऐन खरीप हंगामात महत्वाच्या अधिकाºयांची पदे रिक्त झाल्याने कृषी विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. कार्यालयीन कामकाजावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. तालुका कृषी अधिकारी आर.बी. हारणे हे कार्यमुक्त झाले असून त्यांचा पदभार बदली झालेल्या मंडळ कृषी अधिकारी जी.जे. बळवंतकर, यांच्याकडे सोपविला आहे. बळवंतकर यांचीही शिरडशहापूर येथे बदली झाली असून त्यांचा पदभार कुणाकडे द्यावा, असा पेच कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागातील महत्वाची रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना अत्यल्प दरात बियाणांचे वाटप होत आहे. येथील तालुका कृषी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्याने या वाटपात अनियमितता होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.मात्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने तरी पर्याय देणे गरजेचे असताना तसे झाले नाही.ऐन खरीप हंगामात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचा एकही अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागात दौºयावर फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे खते-बियाणे, औषधी संबंधित माहिती शेतकºयांना मिळत नसल्याचे चित्र आहे.तालुका कृषी अधिकाºयांसह तीनही मंडळ कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक असे एकूण ६ अधिकाºयांची तालुक्याबाहेर बदली झाली आहे. परंतु त्यांच्या जागी एकाही अधिकारी देण्यात आला नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र