कुरूंद्यातही डेंग्यूचा रुग्ण; आरोग्य विभाग हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:01 IST2018-04-27T00:01:29+5:302018-04-27T00:01:29+5:30
येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प्रकार समोर येत आहे.

कुरूंद्यातही डेंग्यूचा रुग्ण; आरोग्य विभाग हादरला
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प्रकार समोर येत आहे.
महंमदपूरवाडी येथे डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातल्याने चार बालकांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर कुरूंद्यातही डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. कुरूंदा येथील संदेश नामदेवराव दळवी (१०) या बालकाला गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताप येत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. कुरूंद्यात यापूर्वीही काही बालकांना डेंग्यूसदृश्य आजार झाला होता.
गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून केरकचऱ्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साफसफाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने रोगराई पसरत आहे. कुरूंदा येथील आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी दळवी गल्लीत पाण्यामध्ये औषध टाकून स्वच्छ पाणी ठेवण्याचे आवाहन केले. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे समजते. कुरूंद्यात धूरफवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.