सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:44 IST2018-04-26T18:44:32+5:302018-04-26T18:44:32+5:30
घरकुल योजनेचे अनुदान त्वरित द्यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन
सेनगाव ( हिंगोली ) : घरकुल योजनेचे अनुदान त्वरित द्यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन स्वीकारण्यास गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे आंदोलकांनी निवेदनाची प्रत त्यांच्या रिकाम्या खुर्चीला चीटकवत संताप व्यक्त केला.
मागील दोन वर्षापासून प्रंलबीत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान दयावे या मागणीसाठी आज सकाळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात आले. यावेळी कार्यालयात या विषयावर चर्चा करण्यासाठी गटविकास अधिकारी तसेच इतर कोणी जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हते. यामुळे आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदनाची प्रत चिकटवत संताप व्यक्त केला. आंदोलनात प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख अँड. विजय राऊत, तालुका अध्यक्ष गजानन कावरखे, शेख सिंकदर, शेख रफिक, शेख रहिम, शेख बशीर, उत्तम खंदारे, दत्ता रसाळ, दशरथ रसाळ, बाबाराव गायकवाड, मारोती कांबळे आदी घरकुल लाभार्थी उपस्थित होते.