कळमनुरीत वाळूचे ट्रॅक्टर उलटल्याने मजूराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:38 IST2019-04-09T17:37:50+5:302019-04-09T17:38:24+5:30

या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे.

the death of the laborer in tractor accident | कळमनुरीत वाळूचे ट्रॅक्टर उलटल्याने मजूराचा मृत्यू

कळमनुरीत वाळूचे ट्रॅक्टर उलटल्याने मजूराचा मृत्यू

कळमनुरी (हिंगोली ) : हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर आज (दि.९ ) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान एक ट्रॅक्टर उलटल्याने त्यातील एका मजूराचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण तुकाराम वानोळे असे मृताचे नाव असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅक्टर क्र. एमएच ३८ व्ही १३३० हे वाळू घेवून माळेगावकडे येत होते. मयत लक्ष्मण तुकाराम वानोळे (२०, रा. घोळवा ता. कळमनुरी) हा ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये बसला होता. घोळवा पाटीजवळ ट्रॅक्टर पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबून लक्ष्मण वानोळे हा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच फौजदार श्रीराम जामगे, पोहेका सय्यद अली यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान प्रशासनाची नजर चुकवत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

Web Title: the death of the laborer in tractor accident