हिंगोलीत अवकाळी पावसात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:16 IST2019-03-26T14:15:32+5:302019-03-26T14:16:19+5:30
तालुक्यातील दुघाळा येथे सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला.

हिंगोलीत अवकाळी पावसात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
औंढा नागनाथ (हिंगोली) : तालुक्यातील दुघाळा येथे सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. यात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री 10 च्या सुमारास घडली आहे.
बबन संतोबा पोले (४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोले यांची दुघाळा शिवारात गट क्रमांक 195 मध्ये शेती होती. सोमवारी रात्री ते शेतामध्ये होते. रात्री 9 वाजल्यापासून या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु झाला. याचा दरम्यान पोले यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रात्रीच तलाठी विजय सोमटकर यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. पोले यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली असा परिवार आहे.