शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

६०५ चालक-वाहकांचा रोज २३ हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढू लागले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात एस. टी. महामंळाचे हिंगोली, वसमत ...

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढू लागले आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात एस. टी. महामंळाचे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. हिंगोली आगारात ५७ बसेस असून चालक १२३, वाहक १२३, वसमत आगारात ५५ बसेस असून चालक ११०, वाहक १०५ तर कळमनुरी आगारात ३० बसेस असून चालक ७२, वाहक ७२ अशी संख्या आजमितीस कार्यरत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एस. टी. महामंडळाच्या चालक आणि वाहकांना लस दिली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करीत आहेत. प्रवाशांनी मास्क घातला तरच त्यांना बसेसमध्ये प्रवेश द्या, अशा सूचना एस. टी. महामंडळाने चालक-वाहकांना दिल्या आहेत. परंतु, काही प्रवासी मात्र बसमध्ये चढतेवेळेस मास्क घालत आहेत. नंतर मात्र बसमध्ये जागा मिळाल्यास मास्कचा त्यांना विसर पडत आहे. कोरोनामुळे काही मार्गावर प्रवासी संख्या घटली असली तरी बाजारपेठेच्या गावी मात्र प्रवासी संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे चालक-वाहकांचा संपर्क प्रवाशांशी येवू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांचा विचार करुन करुन त्यांना कोरोना लस देणे गरजेचे आहे. हिंगोली २६०, कळमनुरी १४८ आणि वसमत आगारातील बसेसच्या रोजच्या फेऱ्या २६० अशा एकूण ६६८ होत आहेत.

महामंडळाच्या वतीने केला जातो मास्क, सॅनिटायझरचा खर्च

मार्च महिन्यापासून कोरोना आजाराने डोके वर काढले आहे. चार-पाच महिने तर कोरोनामुळे एस. टी. बसेस बंदच होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरु केल्या आहेत. आता आठ-दहा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. गर्दीतही चालक-वाहकांना प्रवास करावा लागत आहे. चालक-वाहकांना एस. टी. महामंडळाच्या वतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप वेळोवेळी केले जाते आणि आजही केले जात आहे. बस डेपोतून बाहेर सोडतेवेळेस स्वच्छपणे धुतली जाते. चालक, वाहकांना दिल्या जाणाऱ्या मास्क, सॅनिटायझरचा सर्व खर्च एस. टी. महामंडळाच्या वतीने केला जातो. याचबरोबर चालक-वाहकांची पुरेपुर काळजीही घेतली जाते.

-मुक्तेश्वर जोशी, विभाग नियंत्रक ,एस. टी. महामंडळ, परभणी विभाग

प्रतिक्रिया

कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या गेल्या दहा-बारा दिवसांपासून कमी-जास्त होत आहे. चालक आणि वाहकांना सॅनिटायझर, मास्क घालून प्रवास करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रवासी मास्क न घालता येत असेल तर त्यास महामंडळाच्या बसमधून उतरा असेही सांगितले आहे.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, आगार, हिंगोली