Coronavirus In Hingoli : बाधित तलाठी महिलेच्या संपर्कातील १२ शेतकरी क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:57 IST2020-07-07T13:56:35+5:302020-07-07T13:57:36+5:30
बोराळा तलाठी सज्जा अंतर्गत बोराळा, म्हातारगाव, महागाव येथील शेतकरी महिला तलाठी यांच्या संपर्कात

Coronavirus In Hingoli : बाधित तलाठी महिलेच्या संपर्कातील १२ शेतकरी क्वॉरंटाईन
कौठा : वसमत तालुक्यातील बोराळा सज्जाच्या तलाठी महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
सध्या कर्जमाफी योजनेत पात्र शेतकरी, नवीन पीककर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची शेतकरी जुळवाजुळव करत आहेत. त्यासाठी सातबारा, होल्डींग इत्यादी कागदपत्रे हे संबंधित तलाठ्याकडून घेण्यासाठी सगळीकडेच गर्दी होत आहे. बोराळा तलाठी सज्जा अंतर्गत बोराळा, म्हातारगाव, महागाव येथील शेतकरी हे बाधित तलाठी महिलेच्या संपर्कात आले होते. विविध शासकीय कामानिमित्त तलाठी महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण १२ शेतकऱ्यांना बोराळा आरोग्य उपकेंद्र अंतर्गत गावांत सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्वॉरंटाईन केल्याचे डॉ. दीपक खराटे यांनी सांगितले.