न.प.च्या मालमत्ता करवसुलीत कोरोनाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:26 AM2021-03-07T04:26:54+5:302021-03-07T04:26:54+5:30

सर्व मालमत्ता धारकांना न.प.च्या वतीने मागणी बिल देण्यात आले आहे. ३१ मार्च २०२० ची ६४ लाख २६ हजारांची थकबाकी ...

Coronation scandal in NP's property tax collection | न.प.च्या मालमत्ता करवसुलीत कोरोनाचा खोडा

न.प.च्या मालमत्ता करवसुलीत कोरोनाचा खोडा

Next

सर्व मालमत्ता धारकांना न.प.च्या वतीने मागणी बिल देण्यात आले आहे. ३१ मार्च २०२० ची ६४ लाख २६ हजारांची थकबाकी आहे. या वर्षाचे मागणी बिल १ कोटी २० लाख ६१ हजार आहे. एकूण मागणी बिल १ कोटी ८४ हजार यपयांची थकबाकी एवढे आहे. आतापर्यंत न.प.ने ८५ लाख ८१ हजार रूपयांची थकबाकी वसूल केली आहे. मालमत्ता कराची ५७.८४ टक्के वसुली झाली आहे. शिक्षण कर १६.६२ टक्के, वृक्ष संवर्धन कराची १६.६२, रोजगार हमी योजना कराची २०.८ टक्के , पाणीपुरवठा फिस ४९.१० टक्के, न.प.च्या मालकीची दुकाने गाळे व इमारत कराची ४१.२५ टक्के अशी एकूण ४६.४१ टक्के कर वसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे कर वसुलीला काही प्रमाणात वेळ लागला आहे. १ ते ७ मार्च दरम्यान संचारबंदी असल्याने या सात दिवसांत करवसुली झाली नाही. शासकीय कार्यालयाकडे असलेली थकबाकी वसूल करण्यात येत आहे. सर्व मालमत्ता धारकांना २ महिन्यांपूर्वी मागणी बिल देण्यात आले होत. परंतु १५ दिवसांच्या आत कर भरणा करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु १५ दिवसांची मुदत संपूनही कर भरणा अनेक मालमत्ता धारकांनी केला नाही. कर भरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांना नाेटिसा बजावण्यात येणार असल्याचे न.प.चे डी.ए. गव्हाणकर यांनी सांगितले. मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करून प.ला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी उमेश कोठीकर, ए.डी दायमा, म. जाकेर आदींनी केले आहे. कर वसुलीसाठी न.प.ने पथक तयार केले असून हे पथक मालमत्ता धारकांकडे जावून थकबाकी वसूल करीत आहे. कोरोनामुळे कर वसुलीला गती येत नसल्याचे न.प. मधून सांगण्यात आले. न.प.च्या पथकात जी.के. वाघ, सुभाष काळे. म. मुक्षतार, डी.एच. काळे आदींचा समावेश आहे. पथकाने माबाईल टॉवरधारकांना भेटून कर लवकर भरण्याचे सांगितले. त्यांनी कर लवकर भरण्याचे आश्वासन दिले. त्यांनी तत्काळ करभरणा न केल्यास माबाईल टॉवर सिल करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Coronation scandal in NP's property tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.