काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन; केंद्र सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 15:24 IST2021-06-07T15:23:29+5:302021-06-07T15:24:22+5:30
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.

काँग्रेसचे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन; केंद्र सरकारच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार हिंगोलीत आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील चौधरी पेट्रोलपंपासमोर सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये जवळ पोहचला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारही दरवाढ अन्यायी असल्याची टीका करुंन दरवाढीविरोधात आज हिंगोलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला.
आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष बापुराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, तालुकाध्यक्ष शामराव जगताप, काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, नगरसेवक माबुद बागवान, नगरसेवक आरेफ लाला व मुजीब कुरेशी,डॉ . राजेश भोसले, आबेदअली जहांगीरदार, माजी जि.प.सदस्य नामदेवराव नागरे, नजीर पठाण, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष जुबेर मामु, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी नागरे, सुमित चौधरी, बालाजी पारिस्कर, विठ्ठल पडघन, विठ्ठल जाधव, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, राजदत्त देशमुख, शेख एजास, करीम फुलारी आदींचा सहभाग होता.