फटाके फोडण्यावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:53 IST2018-11-11T00:53:23+5:302018-11-11T00:53:39+5:30
येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फटाके फोडण्यावरून हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथे तलाव भागात घरासमोर फटाके का फोडता, असे विचारले असता अनुसया माधव पातळे (४०) या महिलेस थापडबुक्क्यांनी मारहाण करून काठीने डोके फोडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी अनुसया पातळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश प्रभू पंडित व आकाश गणेश डुकरे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अविनाश पंडित याने दिलेल्या फिर्यादीवरून ‘तु घरी रात्री बे रात्री का येतोस,’ असे म्हणून मारहाण केल्या प्रकरणी अनुसया माधव पातळे, माधव दत्तराव पातळे, सुनील माधव पातळे, संगीता दत्तराव पातळे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर हाणामारीच्या घटनेत दोन्हीकडील फिर्यादीचे डोके फुटून जखमी झाले असून, अद्याप एकही आरोपी अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.