हिंगोलीत दोन गटात हाणामारी; वाहनांचे नुकसान

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: July 28, 2023 15:50 IST2023-07-28T15:50:31+5:302023-07-28T15:50:53+5:30

हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज परिसरात झाली घटना

Clash between two groups in Hingoli; Damage to vehicles | हिंगोलीत दोन गटात हाणामारी; वाहनांचे नुकसान

हिंगोलीत दोन गटात हाणामारी; वाहनांचे नुकसान

हिंगोली : येथील विवेकानंद नगरात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी दुपारी ३ वाजेपर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज परिसरात विवेकानंद नगर आहे. या भागात दुपारी दोन गटात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. या वेळी एका कारच्या काचाही फोडण्यात आल्या असून दुचाकीचेही नुकसान झाले. 

घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कार पाठिमागे घेण्यावरून हाणामारी झाली असल्याचे बोलले जात असले तरी मूळ कारण समजू शकले नाही. याप्रकरणी दुपारी ३ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Clash between two groups in Hingoli; Damage to vehicles