घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच; पंचायत समितीचा डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:04 IST2024-12-19T19:04:36+5:302024-12-19T19:04:55+5:30

आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Bribe for Gharkul installment scheme; Panchayat Samiti's data entry operator arrested by ACB | घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच; पंचायत समितीचा डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच; पंचायत समितीचा डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

- हबीब शेख
औंढा नागनाथ (हिंगोली):
घरकुलचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना येथील पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागातील डाटा एंट्री ऑपरेटला हिंगोली लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने रंगेहाथ पकडले. अजय दशरथ पहारे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयात घरकुलासह इतर वैयक्तिक कामासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे. त्यातच घरकुलचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटरला गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या वडिलांचे नावे आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. सदर घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे तक्रारदार व त्यांचे वडिलांचे बँक खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समितीचे डाटा एन्ट्री ऑपरेटर अजय दशरथ पहारे यांने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. 

याबाबत तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने याची ११ डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे एसीबीच्या पथकाने औंढा येथील पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात सापळा रचला. दुपारी साडेतीन वाजता पहारे याने दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. 

आरोपी विरोधात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबी नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक जाधव पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पंचलिंगे पोलीस हवालदार  भगवान मंडलिक पोलीस हवालदार अकबर शेख पोलीस शिपाई शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली.

Web Title: Bribe for Gharkul installment scheme; Panchayat Samiti's data entry operator arrested by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.