युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:47 IST2018-08-14T00:47:21+5:302018-08-14T00:47:35+5:30

युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील मंगळवारा भागात एका घरात युवतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटना सोमवारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
हिंगोली शहरातील मंगळवारा भागात युवतीचा मृतदेह आढळुन आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मयत युवतीचे नाव अंकिता अमोल घुगे (१९) असे आहे. घटनास्थळी पोनि उदयसिंग चंदेल व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही.
या घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोनि चंदेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोउपनि काशिद, सुधीर ढेंबरे, काजी यांनी भेट देऊन पाहणी केली.