मोठी बातमी: पोलिस कर्मचाऱ्याने कुटुंबावरच केली फायरिंग; पत्नीचा मृत्यू तर सासू, मेव्हणा, मुलगा जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 00:01 IST2024-12-26T00:01:23+5:302024-12-26T00:01:58+5:30

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक श्यामराव डोंगरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Big news Police officer fires on family wife dies mother in law brother in law and son injured | मोठी बातमी: पोलिस कर्मचाऱ्याने कुटुंबावरच केली फायरिंग; पत्नीचा मृत्यू तर सासू, मेव्हणा, मुलगा जखमी 

मोठी बातमी: पोलिस कर्मचाऱ्याने कुटुंबावरच केली फायरिंग; पत्नीचा मृत्यू तर सासू, मेव्हणा, मुलगा जखमी 

हिंगोली : हिंगोलीपोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने फायरिंग केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलगी, सासू व मेव्हाण गंभीर जखमी झाला. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत.

वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विलास बळीराम मुकाडे यांचे हिंगोली शहरातील प्रगतीनगरात घर आहे. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते घरी आले असता त्यांनी पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर मुलगा, सासू व मेव्हण्यावरही गोळीबार केला. यात पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा, सासू व मेव्हणा जखमी झाले.

जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचारकरून नांदेडला रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक श्यामराव डोंगरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर विलास मुकाडे हा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Big news Police officer fires on family wife dies mother in law brother in law and son injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.