coronavirus : हिंगोलीत आणखी एक महिला कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 22:12 IST2020-05-25T22:12:08+5:302020-05-25T22:12:49+5:30
७० जणांवर उपचार सुरू

coronavirus : हिंगोलीत आणखी एक महिला कोरोना बाधित
हिंगोली: तालुक्यातील पहेनी येथे मुंबईहून परतलेल्या एका तीस वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी रात्री आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. जिल्ह्यातील रुग्ण संख्या १६० झाली असून ९० जणांना घरी सोडल्याने ७० जण उपचार घेत आहेत.
पहेनी गावातच शाळेतील विलगीकरण कक्षात असलेल्या या महिलेला दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज तिचा रिपोर्ट पॉझिटिव आला. त्यामुळे रुग्ण संख्या १६० वर पोहोचली आहे. यापैकी ९० जण बरे झाल्याने घरी सोडले तर ७० जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत संशयित म्हणून १९५३ जणांना भरती केले होते.
यापैकी १६४९ जण निगेटिव आले आहेत. तर १५४७ जणांना घरी सोडले आहे. अजूनही ४०१ जण विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात भरती आहेत. आता २१० जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.