शेतीच्या वादाने जीव घेतला; कुऱ्हाडीने वार करून चुलत भावांनी तरुणास संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 13:49 IST2021-08-28T13:49:33+5:302021-08-28T13:49:58+5:30
Murder in Hingoli : याप्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

शेतीच्या वादाने जीव घेतला; कुऱ्हाडीने वार करून चुलत भावांनी तरुणास संपवले
कुरुंदा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे शेतीच्या वादातून २३ वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना गंभीर जखमी युवकाचा मृत्यू झाला. शेषेराव केशवराव होडगिर असे मृताचे नाव आहे. ( The agricultural dispute took its Life; The young man was killed by his cousins with an ax)
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, खांबाळा येथील शेषेराव केशवराव होडगिर याचे भावाकीसोबत शेतीचा जुना वाद आहे. शुक्रवारी रात्री शेषेराव शेताकडे जात असताना चुलता भावांनी त्याला अडवले. त्यांच्यात शेतीवरून पुन्हा वाद झाले. अचानक चुलत भावांनी शेषेराववर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी शेषेरावला उपचारासाठी तातडीने नांदेड येथे नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलिस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार, बालाजी जोगदंड, बबन देवकर, संतोष पटवे यांनी पाहणी केली.