विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हिंगोलीत एबीव्हीपीचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 15:12 IST2020-08-27T15:11:24+5:302020-08-27T15:12:17+5:30

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हिंगोलीत एबीव्हीपीचे आंदोलन 

ABVP agitation in Hingoli to protest against lathi charge on students | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हिंगोलीत एबीव्हीपीचे आंदोलन 

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हिंगोलीत एबीव्हीपीचे आंदोलन 

ठळक मुद्देआंदोलकांच्या शासन विरोधी घोषणाबाजी

हिंगोली : धुळे येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हिंगोलीत २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधी घोषणाबाजी करत ‘आम्ही विद्यार्थी आहोत गुन्हेगार नाही’ अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.

धुळे येथे अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थ्यांवर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूक संमतीने पोलिस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज व जबर मारहाण केली. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ २७ ऑगस्ट रोजी शहरातील गांधी चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आशिष वाजपेयी, सोमनाथ वानखेडे, सत्यनारायण तांबीले, गजानन वाबळे, धीरज मुंढे आदी आंदोलनात सहभागी होते.
 

Web Title: ABVP agitation in Hingoli to protest against lathi charge on students