रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 15:33 IST2022-02-27T15:32:29+5:302022-02-27T15:33:00+5:30
रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्याने ही धडक बसल्याची माहिती आहे.

रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा ते टोकाई रस्त्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटरसायकलची धडक बसल्याने २८ वर्षीय एक तरुणाचा जागीच ठार झाला आहे. कुरुंदामार्गे कानोसा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टाेकाई जवळ उसाची ट्राॅली उभी हाेती. या ट्राॅलीला माेटारसायकलवरील युवकाची रात्रीच्या अंधारात धडक बसली.
या भीषण अपघातात संतोष दत्तराव बारसे (वय २८ रा. कानोसा ता. वसमत) हा जागीच ठार झाला आहे. या मार्गावर मागील काही दिवसापासून अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. तसेच या मार्गावर उसाचे ट्रॅक्टर, ट्राॅली बिघाड झाल्यास रस्त्यावर सोडुन देण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीला उभ्या वाहनांना धडक बसून अपघात होण्याचे प्रकारही वाढले आहेत. यासंदर्भात संबंधित कारखानदारांनी व पाेलिसांनी अशाप्रकारे वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.