महावितरणलाच शॉक... चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार
By विजय पाटील | Updated: April 20, 2023 15:32 IST2023-04-20T15:31:24+5:302023-04-20T15:32:16+5:30
याबाबत गोरेगावचे सहायक अभियंत सत्यनारायण बाबूराव वडगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

महावितरणलाच शॉक... चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार
हिंगोली : कधी कशाची चोरी होईल याचा काही नेम नाही. चोरट्यांनी चक्क ७४ पोलवरील २५ क्विंटल वजनाच्या वीज तारा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील शाखा गोरेगाव १ अंतर्गत असणाऱ्या ३३ केव्ही तसेच ११ केव्ही केंद्राशी जोडलेल्या तब्बल ७४ पोलवरील वीजतारा १ मार्च ते १२ एप्रिलदरम्यान कोणीतरी चोरून नेल्या. या तारांची लांबी १२ हजार ३०० मीटर एवढी आहे. तर २५ क्विंटल वजन आहे. यामध्ये महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत गोरेगावचे सहायक अभियंत सत्यनारायण बाबूराव वडगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला. वरिष्ठांची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया केल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला.