घरगुती वादातून अनर्थ झाला; जावयाने ७५ वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून खून केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 11:31 IST2023-05-08T11:31:24+5:302023-05-08T11:31:44+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात आज पहाटेची घटना

घरगुती वादातून अनर्थ झाला; जावयाने ७५ वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून खून केला
- इस्माईल जहागिरदार
वसमत: शहरातील झेंडा चौक भागात सोमवार रोजी पहाटे घरगुती वादातून जावई व सासुचे भांडण झाले. रागाच्या भरात जावयाने ७५ वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केले. यात ती जागीच मरण पावली. शेवंताबाई होणाजी वंजे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, वसमत शहरातील झेंडा चौक भागात शेवंताबाई होणाजी वंजे यांचे जावई बाबासाहेब शिंगारे ( रा.श्रीरामपुर) याच्यासोबत घरगुती कारणावरून पहाटे ५. ३० वाजेच्या सुमारास वाद झाला. वाद विकोपाला जावून रागाच्या भारत जावई शिंगारे याने सासूचे डोके जोरात जमिनीवर आदळले. यात सासू शेवंताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहर पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोनि चंद्रशेखर कदम, जमादार गजानन भोपे,प्रशांत मुंढे,कृष्णा चव्हाण,भगीरथ सवंडकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीस चौकशी करत आहेत.