ब्लॅकमेलकरून एका पाठोपाठ तिघांचा २३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:48 IST2023-12-19T12:48:18+5:302023-12-19T12:48:37+5:30

या घटनांमुळे घाबरलेली पीडित महिला माहेरी गेली.

A 23-year-old married woman was sexually assaulted by three men after blackmail | ब्लॅकमेलकरून एका पाठोपाठ तिघांचा २३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

ब्लॅकमेलकरून एका पाठोपाठ तिघांचा २३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

हिंगोली : तालुक्यातील एका २३ वर्षीय विवाहितेवर तिघांनी अत्याचार केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. हा प्रकार २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या काळात घडला. 

लक्ष्मण रामेश्वर पठाडे, रामप्रसाद हरजी पठाडे, ज्ञानेश्वर योगाजी पठाडे (सर्व रा. चोरजवळा ता. हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत. विवाहित महिलेचा पती घरी नसताना २६ ऑगस्ट रोजी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण पठाडे हा  महिलेच्या घरी आला. तुझ्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असून तुला माहिती देतो असे सांगत पीडित महिलेवर अत्याचार केला. 

दरम्यान, काही दिवसांनंतर रामप्रसाद पठाडे हा पीडित महिलेच्या घरी आला. तुझे व लक्ष्मण याचे संबंध मला माहिती असून ते तुझ्या पतीला सांगतो अशी धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर पठाडे हा महिलेच्या घरी आला. लक्ष्मण व रामप्रसाद यांच्या सोबत असलेले संबंध माहिती असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार केला. या घटनांमुळे घाबरलेली पीडित महिला माहेरी गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व प्रकार सांगितला. 

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून लक्ष्मण पठाडे, रामप्रसाद पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे यांच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, जमादार आकाश पंडीतकर तपास करीत आहेत.

Web Title: A 23-year-old married woman was sexually assaulted by three men after blackmail