शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

८० विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि दुबईत अडकले, हिंगोलीतील विद्यार्थिनीचाही समावेश; परतीचा मार्ग झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:32 IST

​पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटचे ८० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली शहरातील खुशी महावीर बडेरा या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.

हिंगोली : युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमध्ये अडकलेल्या ८० विद्यार्थ्यांचा भारतामध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालय प्रशासन आणि राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे दुबईत अडकलेले हे विद्यार्थी आज, ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता विमानाने भारतात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

​पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटचे ८० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली शहरातील खुशी महावीर बडेरा या विद्यार्थिनीचाही समावेश होता. इंदिरा इन्स्टिट्यूटने २३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांची ही सहल दुबईला नेली होती. दुबई येथील महाविद्यालये आणि विविध व्यावसायिक संस्थांना भेटी देऊन हे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासाचा अनुभव घेत होते.

​१ मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या परतीचे नियोजन होते; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुबई येथील विमानसेवा विस्कळीत झाली आणि अनेक विमाने रद्द करण्यात आली. त्यामुळे हे विद्यार्थी दुबईत अडकून पडले. 

सर्व विद्यार्थी दुबईतील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली होती. दरम्यान, या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि राज्य शासनाने विशेष प्रयत्न केले.

'स्टार एअरलाइन्स'च्या विमानाने हे विद्यार्थी ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता  भारताकडे निघणार आहेत.  दुबई येथील फुर्जा विमानतळावरून हे विद्यार्थी स्टार एअरलाइन्सच्या विमानाने भारताकडे परतीचा प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 80 Students Stranded in Dubai Due to War, Return Secured

Web Summary : Eighty students from Pune's Indira Institute, including a Hingoli student, were stranded in Dubai due to disrupted flights. Thanks to college and government efforts, they are returning to India today via Star Airlines from Fujairah Airport.
टॅग्स :DubaiदुबईIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध